युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-मांडवा येथील संजय चाटे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त संजय चाटे यांनी केलेल्या देशसेवेचा अभिमान- डॉ.संतोष मुंडे

 मांडवा येथील संजय चाटे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त



संजय चाटे यांनी केलेल्या देशसेवेचा अभिमान-  डॉ.संतोष मुंडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :-   तालुक्यातील मांडवा गावचे भूमिपुत्र संजय विक्रम चाटे हे नुकतेच भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांचा सत्कार करताना डॉ.संतोष मुंडे म्हणाले की संजय चाटे यांनी जी देश सेवा केली. त्या सेवेचा आम्हा परळीकरांना अभिमान आहे. त्यांच्या कार्याचा तरुणांनी आदर्श घ्यावा असेही आवाहन केले.

         मांडवा येथील रहिवासी असलेले संजय विक्रम चाटे हे मे 2001 मध्ये केंद्रीय रिझर्व पोलीस बलामध्ये दाखल झाले होते. भारतीय सैन्यात दाखल होताच सुरुवातीच्या काळामध्ये पुणे सेंटर मध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर अकरा वर्ष जम्मू आणि काश्मीर, तसेच तीन वर्ष बिहार, चार वर्षे छत्तीसगड आणि साडेतीन वर्ष दिल्ली असे ठिकाणी त्यांनी काम केले. संजय चाटे यांचे प्राथमिक शिक्षण मांडवा या गावी झाले. त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण शहरातील मिलिंद महाविद्यालयात तर इयत्ता अकरावी वैजनाथ महाविद्यालयात केल्यानंतर पुढील बीएपर्यंत शिक्षण नवगण महाविद्यालयात पूर्ण केले. यादरम्यान भारतीय सैन्यामध्ये भरती निघाली असता त्यांनी देश सेवा करण्याचे पसंत केले आणि सैन्य दलात भरती झाले.

       त्यांना सैन्याचा हा वारसा त्यांचे चुलते दशरथ चाटे यांच्याकडून मिळाला. त्यांचे चुलते दशरथ चाटे हे भारतीय सैन्यामध्ये मेजर सुभेदार या पदावर कार्यरत होते. त्यांच्यामुळे लहानपणापासून त्यांना आपणही सैन्यामध्ये आपल्या चुलत्याप्रमाणे जाऊन सेवा करावी असे मनोमन वाटत होते. त्यांची घरची घरची परिस्थिती तशी सामान्यच होती. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संजय चाटे यांना एक भाऊ, आणि एक बहीण आहे.

      ते नुकतेच 31 ऑगस्ट रोजी भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाले. यानंतर त्यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांनी श्रीनाथ हॉस्पिटलमध्ये सत्कार केला. याप्रसंगी एडवोकेट प्रकाश मुंडे, विठ्ठल साखरे, विजय शिंदे, पत्रकार महादेव गीते आदी उपस्थित होते. 21 वर्षापेक्षा जास्त सेवा काळामध्ये त्यांना सर्वात आव्हानात्मक सेवा कुठे वाटली असे विचारले असता; त्यांनी जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगड मधील नक्षलवादी एरिया हा सर्व सैन्य तसेच पोलीस दलासाठी धोकादायक आहे असे सांगितले. परंतु न घाबरता जवान तिथे काम करतात त्याचा अभिमान असल्याचे म्हणाले. प्रत्येक घरातील एक तरी सदस्य देश सेवा करण्यासाठी सैन्यात जायलाच पाहिजे अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या