इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांची पुण्यतिथी साजरी: समाजबांधवांचा सन्मान

 डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांची पुण्यतिथी साजरी: समाजबांधवांचा सन्मान 



परळी/प्रतिनिधी

श्री.संत गुरूलिंग स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा सप्ताहचा तिसरा दिवस तसेच राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांची दि.1 सप्टेबर रोजी तारखेनुसार पुण्यतिथी यानिमित्त राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती व लिंगायत समाज बांधवांच्या वतीने श्री.संत गुरूलिंग स्वामी व राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी नामांकीत जी.के.फाऊंडेशन पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल दैनिक लोकमतचे पत्रकार श्री.संजय खाकरे, काशीपीठाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ.चेतनाताई गौरशेट्टे,परळी ईनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ.उज्वलाताई आलदे तसेच सामाजिक,धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर श्री.गणपतअप्पा हरंगुळे, श्री.जगदीशअप्पा मिटकर यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच श्री.प्रकाशअप्पा खोत व सप्ताहातील अन्नदाते श्री.विजय नरवणे,अ‍ॅड.गिरीष नरवणे यांचा सत्कार श्री.संत गुरूलिंग स्वामी मंदीर,बेलवाडी येथे  करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या