युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-परळीतून वैष्णोदेवीची दिव्य ज्योत आणण्यासाठी भाविकांचे प्रस्थान


परळीतून वैष्णोदेवीची दिव्य ज्योत आणण्यासाठी भाविकांचे प्रस्थान



नाथ प्रतिष्ठान, राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचा नवरात्र उपक्रम

परळी/ प्रतिनिधी-

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नाथ प्रतिष्ठान व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने माजी मंत्री आ. धनंजय मंुडे, न.प. गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली  राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या विशेष प्रयत्नातून  माँ वैष्णो देवी दर्शन देखावा सादर करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मिर मधील माँ वैष्णोदेवी मंदीरात प्रज्वलीत झालेली दिव्य ज्योत परळी येथे आणली जाणार असून संपुर्ण उत्सवाच्या कालावधीत ही ज्योत अखंडपणे तेवत राहणार आहे. विशेष वाहनाद्वारे संयोजन समितीचे चार सदस्य आज सायंकाळी जम्मू-कश्मिरसाठी रवाना झाले असून परळी येथील श्री वैद्यनाथ मंदीराची शाल देवीजींच्या चरणी अर्पण केली जाणार असून तेथून वैष्णोदेवीची चुनरी आणली जाणार आहे. 

नाथ प्रतिष्ठान, राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या विशेष संयोजनाखाली नवरात्र उत्सव-2022 साजरा केला जाणार असून औद्योगीक वसाहत येथे दुमजली वैष्णोदेवी दर्शन देखावा हुबेहुब पद्धतीने साकारला जात आहे. या देखाव्यात वैष्णोदेवीचे चरण दर्शन, आसपासचे विविध मंदीरे तसेच मुख्य मुर्ती, भुयारी मार्ग साकारला जात आहे. या देखाव्याचे एकुण अंतर 700 फुट एवढे असून डोंगर-दऱ्या आदींचे स्वरुप तेथे साकारले जाणार आहे. 

या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर परळी शहर व परिसरातील भाविकांना वैष्णोदेवी दर्शनाचा साक्षात अनुभव व्हावा, असा संयोजकाचा प्रयत्न असून त्याची अनुभूती अधिक चांगल्या पद्धतीने यावी या दृष्टीकोनातून कटरा-जम्मू कश्मिर येथे वैष्णोदेवी मंदीरात असलेली ज्योत दुसऱ्या ज्योतीला प्रज्वलीत करुन अखंड दिव्य-ज्योत परळीत आणली जाणार आहे. दिव्य ज्योत आणण्यासाठी परळी येथून विशेष वाहन तयार करण्यात आले असून यामध्ये मराठवाडा साथीचे संपादक सतिश बियाणी, प्रकाश वर्मा, संजय शर्मा, बालासाहेब काळे, राजेश मोदाणी यांनी आज वैष्णोदेवीकडे प्रस्थान केले आहे. माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी, मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, सौ. कल्पना बियाणी, राजस्थानी मल्टीस्टेटचे सचिव बद्रीनारायण बाहेती, चंद्रप्रकाश काबरा, जयप्रकाश बियाणी, राधेशाम झंवर, आनंद हडबे यांनी वाहनाचे पूजन करीत प्रवासाला निघालेल्या सर्वांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी विविध स्तरातील मान्यवर नागरिक तसेच दुर्गोत्सव टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या