परळीत राडा: तुंबळ हाणामारीत एक ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... तुंबळ हाणामारीत परळीत राडा झाला. यामध्ये एक जण ठार झाल्याची खळबळजनक घटना परळीतील बरकत नगर भागात घडली आहे. कन्या शाळा रोड ते बरकत नगर रस्त्यावर दोन गटात हाणामारी झाली. यात एकाला जीव गमवावा लागला आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार एका समारंभात हा राडा झाल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयत इसम व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अचानक वाद झाला हा वाद मारामारीपर्यंत पोहचला. यामध्ये एकजण ठार झाला आहे.अल्लाउद्दीन शेख रा.नागापूर असे मयत ईसमाचे नाव आहे.दरम्यान घटनास्थळी प्रचंड जमाव जमा झाला.पोलीस घटनास्थळावर पोहचले असुन परिस्थिती नियंत्रणात आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या मारामारी मध्ये मयत झालेले इसम अल्लाउद्दीन शेख हे नागापूर येथील रहिवासी असून नागापूर येथे त्यांची पान टपरी आहे. नागापूर परिसरात ते सर्व परिचित असून या हाणामारीत त्यांना आपला जीव गमवावा लागला...
परळीतील जीम ट्रेनर तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या परळी वैजनाथ : प्रतिनिधी..... परळी वैजनाथ शहरातील इंदिरानगर परिसरात एका २३ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.२०) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. तुलसी संजय कमळु असे मयत तरुणीचे नाव आहे. मयत तरुणी ही परळी शहरातील एका जिममध्ये ट्रेनर म्हणून कार्यरत होती. परिसरात ती परिचित युवती म्हणून ओळखली जात होती. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परळी शहरातील पद्मावती भागातील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या या युवतीच्या घरी कोणी नव्हते. कुटुंबिय बाहेरगावी असल्याने ती घरात एकटीच होती. गुरुवारी (दि.२०) दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. या घटनेने परिसरात व परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदना साठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तिच्...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतलं. जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा