इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर


बीड, दि. 06, (जि. मा. का.) : राज्य निवडणूक आयोगाने माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 13 ऑक्टोबर 2022 असून हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक 18 ऑक्टोबर 2022 आहे. ही माहिती जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिली.

मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करण्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 31 मे 2022, प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक गुरूवार, दि. 13 ऑक्टोबर 2022, हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी गुरूवार दि. 13 ऑक्टोबर 2022 ते मंगळवार दि. 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत (शनिवार दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी हरकती स्वीकारण्यात येतील), प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्दी करण्याची तारीख शुक्रवार, दि. 21 ऑक्टोबर 2022 आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या