MB NEWS-विनयभंग प्रकरणातील चार आरोपींना दोन वर्षे कारावास व 10 हजार रु.चा दंड

 विनयभंग प्रकरणातील चार आरोपींना दोन वर्षे कारावास व 10 हजार रु.चा दंड



 पो.ह.बालु चव्हाण यांची मोलाची कामगिरी 

परळी (प्रतिनीधी)

 बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना बीड प्रथमवर्ग न्यायालयाने दोन वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली या प्रकरणाचा तपास सध्या संभाजीनगर पोलिस ठाणे परळी येथे कार्यरत असलेले पो.हे.बालु निवृत्ती चव्हाण यांनी तपास करुन मोलाची कामगिरी बजावली.

 बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात दि.3 नोव्हेंबर 2015 रोजी विनयभंग केल्याप्रकरणी पुर्णा येथील शेख पाशा शेख मोहम्मद,शेख सलिम शेख पाशा,शेख कलिम शेख पाशा,शेख आलिम शेख पाशा यांच्याविरुध्द कलम 452,354 अ,324,323 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर पो.हे.बालु चव्हाण यांनी तपास करुन आरोपपत्र दाखल केले होते या प्रकरणाचा निकाल दि.14 ऑक्टोबर रोजी लागला न्यायालयाने सर्व आरोपींना दोन वर्षे कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली या प्रकरणात बालु चव्हाण यांनी योग्य पध्दतीने तपास केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !