इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-‘परळी संचार’ च्या दिवाळी अंकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

 ‘परळी संचार’ च्या दिवाळी अंकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन 








परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः-

सोशलमिडियामुळे प्रिंटमिडियापुढे मोठे आव्हान उभे असतानाही विविध वर्तमानपत्र उत्कृष्ट दिवाळी अंक काढून आपली परंपरा जपत आहेत असे प्रतिपादन मान्यवरांनी करुन‘परळी संचार’ च्या दिवाळी अंकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

परळी येथील ‘परळी संचार’ या साप्ताहिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन  सोमवारी (दि.7) सायंकाळी करण्यात आले.  या कार्यक्रमाला  चंदुलाल बियाणी,बाजीराव धर्माधिकारी,दीपक देशमुख,  पत्रकार लक्ष्मण वाकडे, धनंजय आढाव, प्रा.प्रविण फुटके, जितेंद्र नव्हाडे, दत्ता शिवगण आदी  उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक परळी संचारचे संपादक अनंत कुलकर्णी यांनी केले. 

या दिवाळी अंकात विविध वाचनिय कथा, कविता, लेख यांसह परळीत साजरा झालेल्या  दूर्गोत्सवाची उपक्रमाची कव्हर स्टोरी छापली गेली आहे, त्याचबरोबरच वैद्यनाथ महाविद्यालयाच्या परिसरात डोंगरावर उभारलेल्या भव्य तिरंगा ध्वजाबाबतही लेख आहे अशी माहिती संपादक अनंत कुलकर्णी यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या