इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS-कुठलाही क्लास न लावता स्वयंअध्ययन करत थेट मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी निवड

 कुठलाही क्लास न लावता स्वयंअध्ययन करत थेट मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी निवड



दिंद्रुड : माझ्या मुलांना उच्च शिक्षण द्यायच आहे, त्यांना अधिकारी करायचे आहे हे स्वप्न मनी बाळगत आईने दिवसरात्र शिवणकाम तर वडिलांनी शेतात काबाडकष्ट केले. या कष्टाचे आता चीज झाले असून त्यांच्या मुलाने सचिन व्‍यंकटी वनवे याने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे कुठलाही क्लास न लावता   स्वयंअध्ययन करत थेट मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी सचिनची नेमणूक झाली आहे. 




चोपनवाडी येथील व्‍यंकटी वनवे हे शेतकरी आहेत. कोरडवाहू शेती जोपासताना नाकी नऊ येत असताना आपल्या तीन मुलांना कसे शिकवायचे या विवंचनेत होते. पत्नी शांताने त्यांना साथ देत शेती सोबतच शिवणकाम काम करत संसाराला पाठबळ दिले. हलाखीच्या परिस्थितीत सचिनचे इयत्ता चौथी पर्यंतचे शिक्षण चोपनवाडी येथे झाले. परगावी शिक्षणासाठी जाण्यास खर्च झेपत नसल्याने आपल्या मामाकडे वडवणी येथील महाराणी ताराबाई विद्यालयात सचिनने इयत्ता पाचवी ते नववी पर्यंत शिक्षण घेतले. अभ्यासात चाणाक्ष व हुशार असलेल्या सचिनला मामांनी पुढे अहमदपूर येथे शिक्षणासाठी पाठवले. 




अहमदपूर येथे शिक्षण घेत असताना सचिनने शिकवणी घेणे सुरु केले. यातून तो खर्च भागवू लागला. बीएससी पदवीनंतर त्याने एमपीएससीचा अभ्यास सुरु केला. बीड येथील एका खोलीत तब्बल चार वर्ष अभ्यास करत सचिनने एमपीएससी उत्तीर्ण होण्याचे स्वप्न साकार केले. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होत सचिनची मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर नेमणूक झाली आहे. ही वार्ता समजताच अक्षरशः गावाने सचिनला डोक्यावर घेतले. डीजेच्या तालात अख्खे चोपनवाडी गाव थिरकलं. अख्खा गाव सचिनला खांद्यावर घेऊन नाचू लागलेला पाहून सचिनची आई शांता व वडील व्यंकटी वनवे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले. 




मातीचे ऋण फेडावे ....
मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न माझ्या लेकाने पूर्ण केले आहे. भविष्यात गावासह पंचक्रोशीचा विकास माझ्या लेकाने करून या मातीचे ऋण फेडावे. 
- शांता व्‍यंकटी वनवे, आई




माझे अधुरे स्वप्न पूर्ण झाले 
मी एमपीएससीची तयारी करायचो. मात्र आजरापणामुळे स्पर्धा परीक्षेपासून मी दुरावलो. माझ्या मनातील अधुरे स्वप्न भावाने पूर्ण केले आहे.
- विनोद वनवे, भाऊ



सर्वांच्या साथीने शक्य झाले 
आईचे शिलाई काम तर वडिलांचे शेतातील काबाडकष्ट समोर दिसत होते.  यातून प्रेरणा घेत अभ्यास केला. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे हाच एकमेव ध्यास मनी बाळगला होता. सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो याचा मनस्वी आनंद आहे. यादरम्यान मला माझे मार्गदर्शक जिज्ञासा अभ्यासिकेचे संचालक अमोल धनवे, बहीण प्रियंका, भाऊ विनोद तसेच  मित्र परिवार सदैव सोबत राहिले. 
- सचिन व्यंकटी वनवे

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....