MB NEWS-राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

 राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर 



 राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा रणधुमाळी पहायला मिळणार आहे...


काही महिन्यांपूर्वी राज्यात राजकीय पेच निर्माण झाला होता. शिवसेना दोन गटांत फुटल्याने शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरु आहे. यामुळे याचा परिणाम राज्यातील सरकारबरोबरच पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींबरोबरच ग्राम पंचायतींमध्येही तसेच राजकारण पहायला मिळत आहे.


या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिंदे गटाचे वर्चस्व की ठाकरे गटाचे यावर या निवडणुका रंगणार आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींची ही निवडणूक होणार आहे. २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरु होणार असून १८ डिसेंबरला मतदान, २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. महत्वाचे म्हणजे ७७५१ ग्रा. पंचायतींचे सरपंच हे थेट जनतेतून निवडले जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी 1 हजार 165 ग्रा पंचायतींमध्ये निवडणूक झाली होती.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !