इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS-माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह मान्यवर अतिथींची लाभणार उपस्थिती_

 ऑलिम्पिकसाठी निवड झालेली परळीची सुवर्णकन्या श्रद्धा गायकवाडचा १४ रोजी परळीत भव्य नागरी गौरव



माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह मान्यवर अतिथींची लाभणार उपस्थिती

परळीच्या लेकीच्या कौतुक सोहळ्याची जय्यत तयारी सुरु


परळी वैजनाथ,प्रतिनिधी.....
        परळीच्या कु. श्रद्धा रविंद्र गायकवाड या कन्येनं नुकत्याच अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत "स्केट बोर्ड" या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. तिची ऑलिम्पिकसाठी निवड झालेली आहे.तमाम परळीकरांसाठी हा ऐतिहासिक सुवर्णक्षण आहे, हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी परळीत दि.१४ नोव्हेंबर रोजी या सुवर्णकन्येचा भव्य नागरी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते व मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत परळीच्या सुवर्णकन्येचा गौरव होणार आहे.कौतुक सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असुन या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.



           सोमवार, १४ नोव्हेंबर २०२२ दुपारी ४:०० वाजता. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे भव्य नागरी गौरव  सोहळा होणार आहे.माजी मंत्री आ. धनंजय मुंडे,माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते नागरी सत्कार होणार असून  सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलिस अधिक्षक अंबाजोगाई श्रीमती कविता नेरकर- पवार, शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार प्राप्त खेळाडू तथा भारतीय खो-खो संघटना सचिव डॉ. चंद्रजीत जाधव,अमेरीकेतील एम. आय. टी. विद्यापीठात निवड झालेला भारतातील एकमेव विद्यार्थी आकाश पोपळघट, उपजिल्हाधिकारी सौ.नम्रता चाटे,बीड जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुहासिनी देशमुख, तहसिलदार सुरेश शेजुळ, परळीच्या माजी नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे,न.प.प्रशासक तथा मुख्याधिकारी एस.ए. बोंदर,सुप्रसिद्ध साहित्यिक व गझलाकार प्रा. डॉ. मुकूंद राजपंखे,संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश चाटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



         आपल्या परळीतील लेकीच्या कौतुक सोहळ्यास आणि तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी परळीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन  सुवर्णकन्या श्रद्धा गायकवाड नागरी सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



य्यत तयारी: 'सावित्रीच्या लेकीचा! . परळीच्या सुवर्णकन्येचा !

       परळीतील या लेकीच्या कौतुक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.यासाठी सर्वसमावेशक व सर्वस्तरीय परळीकरांच्या उत्स्फूर्त सहभागाच्या दोन व्यापक बैठका पार पडल्या आहेत. नागरी सत्कार समितीच्या माध्यमातून प्रत्येकजण हा गौरव सोहळा नेत्रदीपक करण्यासाठी प्रयत्नशील आहे. नागरी सत्काराचे भव्य दिव्य आयोजन व उत्तुंग झेप घेणाऱ्या कन्येचा उत्तुंग गौरव परळीच्या वतीने होत असून या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


• सुवर्णकन्येची सत्कार रॅली....

      दरम्यान, परळीत आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात उपस्थित होत असताना सोहळ्यापुर्वी सुवर्णकन्या श्रद्धा रविंद्र गायकवाड हिची सत्कार रॅली काढण्यात येणार आहे.भिमनगर येथून दुपारी २:००वाजता सत्कार रॅली  निघेल.

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....