युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-परळी शहरात बिंगो जुगार केंद्रावर कारवाई

 परळी शहरात बिंगो जुगार केंद्रावर कारवाई










परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      परळी शहरात बेकायदेशीर चालवल्या जात असलेल्या बिंगो जुगार केंद्रावर पोलीसांनी कारवाई केली आहे.
     आरोपीतांनी बींगो नावाचा जुगार खेळत व खेळवीत असतांना संगणक संच, मोबाईल, नगदी सह मिळुन आले म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पो.काॅ.विष्णु फड यांच्या फिर्यादीवरून आरोपी 1) अली खान हबीब खान वय 27 वर्ष रा. मलीकपुरा परळी, 2) शेख नजहर शेख मोहम्मद वय 24 वर्ष मालीपुरा 3) समीर सय्यद इलाही वय 30 वर्ष रा. मलिकपुरा परळी 4) एजाज कादर पठाण 30 वर्ष मलीकपुरा परळी वै. 5) आकाश बैजनाथ हांगरगे वय 21 वर्ष . 6) संजय बालाजी गायकवाड वय 27 वर्ष रा. सुभाष चौक परळी 7) शेख हसन शेख पाशा वय 42 वर्ष मलकपुरा परळी 8) मुराद हमीद पठाण वय 27 वर्ष रा. शिवनगर परळी .9) अन्वर शेख बाबु वय 22 वर्ष रा. बरकत नगर परळी. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत  बिंगो जुगार खेळण्यासाठीचे काँप्युटर, मोबाईल व नगदी असे एकुण 29600/- रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनि गोसावी यांचे कडे देण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या