युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:अभ्यास केलेला लक्षात राहत नसल्याच्या टेन्शनमुळे दहावीच्या विद्यार्थिनींची आत्महत्या

 अभ्यास केलेला लक्षात राहत नसल्याच्या टेन्शनमुळे दहावीच्या विद्यार्थिनींची आत्महत्या




केज :- केलेला अभ्यास लक्षात राहत नसल्याच्या मानसिक दबावातून आणि टेन्शनमुळे केज तालुक्यात एका दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.


या बाबतची माहीती अशी की, केज तालुक्यातील कोठी येथील प्रेरणा किसन डोंगरे ही इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिचे वडील गंगामाऊली साखर साखर कारखान्यात कामाला आहेत. सोमवार दि. १६ जानेवारी रोजी प्रेरणा व तिची आई घरी असताना रात्री १०:३० ते ११:०० वाजण्याच्या सुमारास प्रेरणा हिने घरातील लोखंडी चॅनलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 


या प्रकरणी मयत प्रेरणा डोंगरे हिचे वडील किसन ज्ञानोबा डोंगरे यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की प्रेरणाच्या जुनाट आजारामुळे तिच्या डोक्यात वेगवेगळे विचार येत असल्याने तिने केलेला अभ्यास लक्षात राहत नव्हता. या ताण तणावातून आणि अभ्यासाच्या टेन्शनमुळे तिने आत्महत्या केली. या तिच्या आत्महत्ये बाबत त्यांची कुणा विषयी तक्रार किंवा संशय नाही.


या प्रकरणी फौजदारी दंड संहिता प्रक्रिया १७४ नुसार केज पोलीस ठाण्यात आकस्मिक गुह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या