युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:नाथ शिक्षण संस्था आयोजित स्व.पंडित आण्णा मुंडे क्रिडा महोत्सव लवकरच जिल्हा स्तरावर जाईल-प्रा.प्रविण फुटके

 नाथ शिक्षण संस्था आयोजित स्व.पंडित आण्णा मुंडे क्रिडा महोत्सव लवकरच जिल्हा स्तरावर जाईल-प्रा.प्रविण फुटके


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

          नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला स्वर्गीय पंडित (आण्णा) मुंडे क्रिडा महोत्सव लवकरच जिल्हा स्तरावर जाईल असे प्रतिपादन प्रा. प्रविण फुटके यांनी स्वर्गीय पंडित आण्णा मुंडे क्रिडा महोत्सवाच्या शारदाबाई गुरुलिंगआप्पा मेनकुदळे शाळेत उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले.

              नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी सामाजिक न्याय मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहसचिव प्रदिप खाडे यांच्या संकल्पनेतून नाथ शिक्षण संस्थेतंर्गत स्व.पंडित (आण्णा) मुंडे क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन तालुक्यातील संगम येथील शारदाबाई गुरुलिंगआप्पा मेनकुदळे शाळेत करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमास उद्घाटक प्रा.प्रविण फुटके, प्रमुख पाहुणे पत्रकार महादेव गित्ते, संस्थेचे समन्वयक प्राचार्य अतुल दुबे, मुख्याध्यापक उत्तम साखरे उपस्थित होते. यावेळी प्रा. फुटके, प्राचार्य दुबे व पत्रकार गित्ते यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रा.फुटके यांच्या हस्ते स्लो सायकलीग, १०० मी धावणे, लांबउडी, उंचवडी, गोळा फेक, थाळी फेक, कॅरम, बुद्धिबळ या स्पर्धाचे श्रीफळ वाढवून क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना प्रा.फुटके म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाईलवर गेम न खेळता मैदानावर जावून खेळ खेळले पाहिजेत. आजचा विद्यार्थी मैदानापासून दूर चालला आहे. विद्यार्थ्यांनी खेळाकडे करिअर म्हणून सुध्दा बघितले पाहिजे. खेळामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडते.यश-अपयश पचवण्याची ताकत विद्यार्थ्यांमध्ये येते असून येणाऱ्या काळामध्ये नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला स्वर्गीय पंडित (आण्णा) मुंडे क्रिडा महोत्सव लवकरच जिल्हा स्तरावर जाईल असे प्रतिपादन प्रा फुटके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शन प्राचार्य अतुल दुबे यांनी केले.  आमदार धनंजय मुंडे व सहसचिव प्रदिप खाडे यांच्या संकल्पनेतून स्व.पंडित आण्णा मुंडे क्रिडा महोत्सव सुरू केला असून भविष्यात तालुका, जिल्हा पातळीवर याचे नियोजन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्राचार्य अतुल दुबे यांनी सांगितले. सूत्रसंचालन केंद्रे बि.डी. तर आभार मुख्याध्यापक यु. एस.साखरे यांनी केले तर कार्यक्रमास .आर.सी.गिराम  आर. के.राठोड, एम.ए. कराड,शिक्षकेतर कर्मचारी एस. बी.आष्टेकर सर, डी. एस. स्वामी यांच्या सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या