MB NEWS:भिवा बिडगर यांना मिळालेला पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची पावतीच होय- जनिमियाँ कुरेशी

 भिवा बिडगर यांना मिळालेला पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची पावतीच होय- जनिमियाँ कुरेशी




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांना मिळालेला विशेष गौरव पुरस्कार म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याची पावतीच होय असे प्रतिपादन परळी पंचायत समितीचे माजी उपसभापती जानीमिया कुरेशी यांनी केले.

     मराठवाडा साथीच्या वतीने वर्धापनदिना निमित्त दरवर्षी परळी भूषण पुरस्कार व विशेष गौरव समारंभ येथील वैद्यनाथ औद्योगिक वसाहत सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी भूषण व विशेष गौरव करण्यात आले. या कार्यक्रमात विशेष गौरव मिळाल्याबद्दल नुकताच भिवा बिडगर यांचा जानिमिया कुरेशी  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  याप्रसंगी प्रसिद्ध पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी सत्कार केल्यानंतर जानिमिया कुरेशी यांनी भिवा बिडगर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

    याप्रसंगी पत्रकार बालासाहेब फड, अनिल गायकवाड, महादेव गीते, संतोष घुबंरे, प्रमोद औटी व इतर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!