प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:पंकजा मुंडेंचे सुवर्णकार समाजाने भेटून मानले आभार

 परळीतील सुवर्णकार समाजाला दिलेला शब्द पंकजा मुंडे यांनी पाळला !



श्री संत नरहरी महाराज मंदिराच्या सभागृहाला दिला २० लाखाचा निधी


पंकजा मुंडेंचे सुवर्णकार समाजाने भेटून मानले आभार


परळी वैजनाथ ।दिनांक२०।

शहरातील सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत नरहरी महाराज मंदिराच्या सभागृहासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी २० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी दिल्याबद्दल सुवर्णकार समाजाच्या शिष्टमंडळाने आज पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत. 


   शहरातील श्री संत नरहरी महाराज मंदिराच्या गाभारा आणि शिखर कामाचा तसेच पुनर्निर्माण कामाचा शुभारंभ पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते जानेवारीत झाला होता. मंदिराच्या सभागृहासाठी यापूर्वी त्यांनी  स्थानिक विकास निधीतून दहा लाखाचा निधी दिला होता, ते सभागृह पूर्ण झाले आहे मंदिर पुनर्निर्माणासाठी यापुढेही संपूर्ण सहकार्य करू असा शब्द त्यांनी  याप्रसंगी दिला होता. तो शब्द पाळत त्यांनी जिल्हा विकास नियोजन आराखडय़ातून २० लाख रूपये निधी सभागृह विस्तारीकरणासाठी मंजूर करून दिला आहे. 


   निधी मंजूर करून दिल्याबद्दल समाजाच्या शिष्टमंडळाने आज पंकजाताई मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आभार मानले. यावेळी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राहूल टाक यांनी पंकजाताई मुंडे यांचा सत्कार केला. याप्रसंगी उपाध्यक्ष सुनील (मामा) दहिवाळ, बालाजीसेठ टाक, ज्येष्ठ नेते राजाभाऊ दहिवाळ, भरतसेठ टाक, विजय दहिवाळ, सूर्यकांत कुलथे, सतीश डहाळे, बाबुरावजी शहाणे, दिलीप बुरांडे, संतोष उदावंत, गणेश बोकन, सोमनाथ शहाणे, सचिन दहिवाळ, काशिनाथ शहाणे, संदीप टेहरे, गजानन डहाळे, राजू बंगाली, बाळू घवले, विशाल डहाळे, रोहित बोकन, अशोकराव दहिवाळ, रमेशराव धारासुरकर, हर्षल शहाणे, विशाल शहाणे, राजु बोकन, अनिल दहिवाळ, वैजनाथ कुलथे आदी उपस्थित होते. अशोक (बाळु) शहाणे यांनी याचे प्रास्ताविक केले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या