युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:हिवरा, गोवर्धन, मलनाथपूर, रामेवाडी सह सात गावांमध्ये होणार कामांना सुरवात

पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते ११ कोटी रूपयांच्या जलजीवन मिशन कामांचे उद्या भूमिपूजन

हिवरा, गोवर्धन, मलनाथपूर, रामेवाडी सह सात गावांमध्ये होणार कामांना सुरवात


परळी वैजनाथ ।दिनांक १८।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या रविवार व सोमवार या दोन दिवसांत सुमारे अकरा   कोटी रूपयांच्या जलजीवन मिशन कामांचे भूमिपूजन होत आहे. तालुक्यातील हिवरा, गोवर्धन, मलनाथपूर, रामेवाडी सह सात गावांमध्ये त्या पाणी पुरवठा कामांना सुरवात करणार आहेत. 


   केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्हयात जलजीवन मिशन योजना कार्यान्वित झाली आहे. पंकजाताई मुंडे आणि खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी त्यासाठी प्रयत्न करून या योजनेत परळी तालुक्यासह जिल्हयातील सर्वच गावांचा यात समावेश केला आहे. या मिशन अंतर्गत पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते ता. १९ व २० मार्च रोजी मागील आठवडय़ानंतर पुन्हा एकदा मतदारसंघातील विविध गावांमध्ये पाणी पुरवठा योजनेच्या कामांना सुरवात होणार आहे.


   उद्या रविवारी सायंकाळी ५ वा. मलनाथपूर (५७ लाख रू.), सायंकाळी ६ वा. रामेवाडी-कासारवाडी (१ कोटी), संध्याकाळी ७ वा.हिवरा (३ कोटी ६७ लाख) आणि रात्रौ ८ वा.   गोवर्धन (१ कोटी ६३ लाख) येथे  तर २० मार्च रोजी सायंकाळी ६ वा. सेलू परळी (१ कोटी), संध्याकाळी ७ वा. नंदनज (५४ लाख) आणि रात्रौ  ८ वा. सारडगाव (२ कोटी ३२ लाख) येथे जलजीवन मिशन अंतर्गत कामाचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या