युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:पंकजाताई मुंडे यांच्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

 पंकजाताई मुंडे यांच्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल


वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडयाला राज्य सरकारने दिली चालना


परळी वैजनाथ ।दिनांक १६।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पत्राची तसेच प्रत्यक्ष भेटीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून १३३ कोटीच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडयाला चालना दिली आहे. या आराखड्याच्या वाढीव मंजुरीस त्यांनी मान्यता देण्याचे संकेत दिले आहेत. 


  पंकजाताई मुंडे बीडच्या पालकमंत्री असताना  सुधीर मुनगंटीवार राज्याचे अर्थमंत्री होते.  

पंकजाताई मुंडे यांनी वैद्यनाथ ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या तीर्थक्षेत्र विकासाचा ध्यास घेतला होता, त्यांनी यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करून तीर्थक्षेत्र विकासासाठी १३३ कोटी ५८ लक्ष रुपयाचा विकास आराखडा मंजूर करून घेतला होता.  या आराखड्यातील कामांसाठी त्यावेळी ३५ कोटी रुपयांचा निधी देखील पुरवणी मागणीव्दारे उपलब्ध झाला होता.  याच निधीतून २० कोटीच्या भक्त निवासाचे बांधकाम  सध्या  प्रगतीपथावर आहे.


दोन वेळा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पत्राची घेतली दखल

-------------



हा आराखडा जशास तसा  मंजूर करावा आणि त्याला गती द्यावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी गतवर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून केली होती. आज मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दालनात सर्व संबंधित मंत्र्यांसह बैठक घेऊन या आराखड्याला चालना दिली असून वाढीव आराखडा देखील मंजूर करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, परळीच्या तीर्थक्षेत्र विकासाला गती देण्याची कार्यवाही सुरू केल्याबद्दल पंकजाताईंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. 

 ••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या