इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:खळबळजनक: 'स्नेहा' नाव हातावर गोंदवलेलं; अनोळखी इसमाचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळला

खळबळजनक:  'स्नेहा' नाव हातावर गोंदवलेलं;  अनोळखी इसमाचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळला



परळी वैजनाथ....

परळी तालुक्यातील मांडेखेल शिवारात रामनगर तांड्याजवळ मंगळवारी रात्री तरुणाचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृताची अद्याप ओळख पटली नसून पोलीस तपास करत आहेत.मृतदेह परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

        मृताच्या अंगात निळी जीन्स पॅन्ट, बदामी रंगाचे शर्ट व कमरेला बेल्ट, पायात बुट आहे. तसेच हातावर स्नेहा नाव गोंदविलेले आहे. आंबाजोगाईच्या  अपर पोलीस अधीक्षक कविता  नेरकर , उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले , परळी ग्रामीण चे पोलीस निरीक्षक  सुरेश चाटे  यांच्या मार्गदर्शनाखाली   सपोनी  नारायण गीते , पोउपनि  गणेश झांबरे, हवालदार केकान, पोलिस नाईक नवनाथ हरगावकर, सुनील अन्नमवार, येरडलावार, एकुलवार यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या