परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:संभाजी ब्रिगेडचा संघटन सक्षमीकरणाचा बैठकीत निर्धार

 संभाजी ब्रिगेडचा संघटन सक्षमीकरणाचा बैठकीत निर्धार 

परळी वैजनाथ...

शनिवार दि 6 मे रोजी संभाजी ब्रिगेड सक्षमीकरण दौरा बैठक संपन्न झाली या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष  गजानन पारधी, प्रदेश उपाध्यक्ष  अण्णासाहेब सावंत  मार्गदर्शक होते. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुका व महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडची बांधणी करून संघटन सक्षमीकरण करण्यासाठी व संभाजी ब्रिगेडची गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत संघटन मजबूत करणे यासह विविध मुद्द्यावर तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांना वेगवेगळ्या जिम्मेदाऱ्या देऊन पुढील तीन महिन्यांमध्ये पूर्ण संभाजी ब्रिगेडची बांधणी करण्याची जिम्मेदारी व इतर काही मुद्द्या साठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक सुज्वल मंगल कार्यालय जलालपुर रोड परळी वैद्यनाथ येथे संपन्न झाली या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवश्री डॉ गजानन पारधी सर, प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत मामा यांच्या मार्गदर्शनाखाली व विभागीय सचिव शिवश्री विलास गुंजाळ, संभाजी ब्रिगेड बीड जिल्हा अध्यक्ष प्रवीण ठोंबरे, जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव सर, जिल्हा उपाध्यक्ष राहुल खोडसे जिल्हा सचिव नारायण मुळे, जिल्हा संघटक गजानन अंबड, संभाजी ब्रिगेड परळी तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज, परळी शहराध्यक्ष विश्वंभर मोरे, संभाजी ब्रिगेड अंबाजोगाई तालुका अध्यक्ष संभाजीराव घोरपडे, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष शिवश्री ईश्वर जिजा सोनवणे, विद्यार्थी आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री विकास ठेहरे यांच्या उपस्थितीत तसेच या बैठकीला परळी तालुका कार्याध्यक्ष शिवश्री प्रद्युम्न सोनवणे, संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष शिवश्री लक्ष्मण दादा गव्हाणे, तालुका संघटक शिवश्री हनुमंत दिवटे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष शिवश्री नामदेवराव भालेराव, दिव्यांग आघाडी तालुकाध्यक्ष शिवश्री गणेश शिंदे, विद्यार्थी आघाडी तालुका सचिव शिवश्री विद्याधर शिरसाठ, तालुका प्रसिद्धीप्रमुख शिवश्री विष्णुपंत पतंगे, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष शिवश्री वैजनाथ सगर, तालुका सचिव शिवश्री पुंडलिक लोणकर, शहर उपाध्यक्ष शिवश्री गणेश मस्के, महिला आघाडी तालुका सहसचिव शिवमती ज्योतीताई अंबड, शिवश्री योगेश महाराज अंबड, मराठा सेवा संघ शहर सचिव शिवश्री राजेश पवार, शिवश्री शिवाजीराव भोसले सर, शिवश्री एकनाथ घाडगे, शिवश्री वेंकटेश बदले, शिवश्री बालाजी सातपुते, शिवश्री विकास नानवटे, शिवश्री दिगंबर सोनवणे, शिवश्री तुकाराम लुगडे, शिवश्री विजयराव सटाले, शिवश्री राधाकिसन लुगडे, शिवश्री दत्ता मुजमुले, शिवश्री प्रविण खोडसे, शिवश्री शिवचंद्र लुगडे, शिवश्री परमेश्वर लुगडे, शिवश्री किरण लुगडे, शिवश्री ज्ञानेश्वर सटाले, शिवश्री बालाजी सातपुते, शिवश्री समाधान ताटे, शिवश्री दत्ता सातभाई, शिवश्री धर्मराज सटाले, शिवश्री छत्रगुण नाना लांडगे, शिवश्री गुलाबराव शिंदे, शिवश्री गोविंद खेडेकर, शिवश्री मनोज सोमवंशी, शिवश्री पवन नानवटे शिवश्री पांडुरंग गायकवाड, शिवश्री अतुल नानवटे, शिवश्री प्रदीप नानवटे, शिवश्री ओमकार नानवटे, शिवश्री राहुल नानवटे, शिवश्री संजय आरसुळ, शिवश्री ओमकार मुंडे, शिवश्री गणेश डाके, शिवश्री वैभव नानवटे, शिवश्री विनायक कदम, शिवश्री उत्तमराव सटाले शिवश्री सदाशिव सटाले यासह संभाजी ब्रिगेड पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!