इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 प्रतीक्षा लहू शिंपलेला शालांत प्रमाणपत्र परीक्षेत 93 टक्के गुण



परळी प्रतिनिधी.   नुकत्याच जाहीर झालेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत  होळकर चौकातील रहिवासी कु. प्रतीक्षा लहू शिंपले हिला 93 टक्के गुण मिळाले असून तिला मिळालेल्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.

    कु. प्रतीक्षा ही अभिनव विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मार्च 2023  मध्ये झालेल्या  शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये कु. प्रतीक्षा हिला 500 पैकी 465 गुण मिळाले आहेत. तिने संस्कृत मध्ये 100 पैकी 100 गुण घेतले आहेत.

      तिला मिळालेल्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, आई,मामा सामाजिक कार्यकर्ते नवनाथ दाने, नातेवाईक  व सर्व समाज बांधवांनी अभिनंदन केले आहे. कौतुक केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या