इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

 पंढरपुरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक अमित घाडगे पाटील यांच्या वतीने हजारो वारकऱ्यांना फराळाचे वाटप



पंढरपूर (प्रतिनिधी):-आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांना तसेच भाविक भक्तांना फराळाचे व पाण्याचे करण्यात आले. मराठाभूषण, राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक अमित घाडगे पाटील यांच्या वतीने दि.29 जुन 2023 रोजी पंढरपुरात आलेल्या भाविक भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले.


आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी असते. लाखो भाविक भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत येत असतात. या निमित्त हजारो वारकऱ्यांना, भाविक भक्तांना पिण्याचे पाणी, साबुदाणा, फराळाचे लाडू आदींचे वाटप मराठा भूषण, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक अमित घाडगे पाटील यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक अमित घाडगे पाटील यांच्यासह उक्कडगावचे सरपंच भाऊ मोरे, हनुमान सातपुते, अनिल सोळंके, महेश जाधव, लक्ष्मण जाधव, राहुल भोसले, अभिषेक देवकर आदींनी फराळ वाटपाच्या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....