अंबाजोगाई अपर जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस पाटील पदाचे आरक्षण सोडत

अंबाजोगाई अपर जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस पाटील पदाचे आरक्षण सोडत


        बीड दि. 23, (जिमाका) :बीड जिल्हृयातील सर्व उपविभागातील पोलीस पाटील रिक्त पदे भरण्याबाबत कालबध्द कार्यक्रम जाहीर झाला असून कालबध्द कार्यक्रमाच्या अनुषंगाने अंबाजोगाई उपविभागातील संबंधित गावातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाचे गावनिहाय आरक्षण जाहीर करावयाचे आहे.

     अंबाजोगाई उपविभागातील केज आणि अंबाजोगाई या दोन तालुक्यामध्ये मिळून एकूण 197 पोलीस पाटील यांचे पदे रिक्त असून ज्या गावातील पदे रिक्त आहेत ते विचारात घेवुन लोकसंख्येच्या टक्केवारी आधारे प्रवर्ग निहाय आरक्षण व त्यामधून 30 टक्के महिला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

     सदर प्रवर्ग निहाय आरक्षण दि. 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता अपर जिल्हाधिकारी कार्यालय, यशवंतराव चव्हाण चौक, अंबाजोगाई येथील हॉलमध्ये काढण्याचे निश्चित केले असून पोलीस पाटील पद रिक्त असलेल्या गावातील नागरीकांनी आरक्षण सोडतीस उपस्थित राहता येईल, असे अंबाजोगाई उपविभागीय कार्यालयाचे, उपविभागीय दंडाधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार