जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे यांची परळी उपजिल्हा रुग्णालयाला भेट

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे यांची परळी उपजिल्हा रुग्णालयाला भेट



परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

        बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बडे यांनी आज परळी येथे येऊन उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली व परिस्थितीची पाहणी केली.

       जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अशोक आर. बडे यांनी परळी वैजनाथ उपजिल्हा रुग्णालयात येऊन विविध विभागात पाहणी केली. रुग्णालय व रुग्णांच्या समस्या बाबत आढावा घेतला. त्याचबरोबर प्रशासनाला आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण गुट्टे डॉ.दिनेश कुरमे डॉ. विठ्ठल कराड, डॉ. तुकाराम गुट्टे, सहाय्यक अधीक्षक रामधन कराड आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व विभाग प्रमुख, स्टाफ नर्स, कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार