माजलगाव तहसील कार्यालयात पोलीस पाटील पदाचे आरक्षण सोडत

  माजलगाव तहसील कार्यालयात पोलीस पाटील पदाचे आरक्षण सोडत 



 

        बीड दि. 23, (जिमाका) :बीड जिल्हृयातील सर्व उपविभागातील पोलीस पाटील रिक्त पदे भरण्याबाबत कालबध्द कार्यक्रम जाहीर झाला असून कालबध्द कार्यक्रमाच्या अनुषंगाने माजलगाव उपविभागातील संबंधित गावातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाचे गावनिहाय आरक्षण जाहीर करावयाचे आहे.

     माजलगाव उपविभागातील माजलगाव, धारुर, वडवणी या तीन तालुक्यामध्ये मिळून एकूण 193 पोलीस पाटील यांचे पदे रिक्त असून ज्या गावातील पदे रिक्त आहेत ते विचारात घेवुन लोकसंख्येच्या टक्केवारी आधारे प्रवर्ग निहाय आरक्षण व त्यामधून 30 टक्के महिला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

     सदर प्रवर्ग निहाय आरक्षण दि. 6 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसील कार्यालय माजलगाव येथील बैठक हॉलमध्ये काढण्याचे निश्चित केले असून पोलीस पाटील पद रिक्त असलेल्या गावातील नागरीकांनी आरक्षण सोडतीस उपस्थित राहता येईल, असे माजलगावचे उपविभागीय कार्यालयाचे, उपविभागीय दंडाधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !