माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील घटना

 आजीच्या डोक्यात दगड घालून  नातवाने केला खून



माजलगाव दि.२३ (प्रतिनिधी)  माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथे ७२ वर्ष वयाच्या आजीच्या डोक्यात दगड घालून २९ वर्षीय नातवाने  आजीचा खून केल्याची घटना घडली आहे.

    माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील कौशल्याबाई किसन राऊत वय ७२ वर्ष त्या आपल्या घरी थांबल्या असता आज दिनांक २३ रोजी त्यांचा नातू राहुल बालासाहेब राऊत व 29 वर्ष या आजी नातवाची किरकोळ कारणावरून कुरबुर झाली. या कुरबुरीचे रूपांतर वाढत असताना राहुल राऊत याने आपल्या आजीच्या डोक्यात दगडाने वार करून आजीचा जागीच खून केल्याची घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत आईचा खून केल्याप्रकरणी मुलाच्या विरोधात बाळासाहेब राऊत दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले आहेत.मयत आजीचा मृतदेह माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार