सर्व स्तरातून अभिनंदन!

 घवघवीत यश: राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत परळीच्या वैभव लोणकरची अधीक्षक पदी नियुक्ती



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
         राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत परळीच्या वैभव लोणकरची अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.या घवघवीत यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
        परळी येथील जलालपूर रोड स्थित वैभव सुरेखा संतोष लोणकरची राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था कर्नाटक (NITK) सुरथकल येथे अधीक्षक (क्लास 2) पदी नियुक्ती झाली आहे. त्याने 1 जानेवारी रोजी आपला पदभार स्वीकारला. वैभवने जिद्द, चिकाटी, परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले असून याआधी त्याने भारतीय विज्ञान संस्थान (IISc), बेंगलोर आणि इन्फोसिस पुणे येथे नोकरी केलेली आहे.तो आपल्या यशाचे श्रेय आई, वडील आणि भावाला देतो. त्याच्या यशाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!