तीपन्ना धोत्रे यांचे निधन

 तीपन्ना धोत्रे यांचे निधन



परळी वै.(प्रतिनिधी)

      परळी शहरातील सामाजिक कार्यात सतत सहभागी असणारे तिपन्ना लक्ष्मण धोत्रे यांचे दीर्घ आजाराने बुधवारदिनांक 29 रोजी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान निधन झाले मृत्यू समयी ते 68 वर्षाचे होते परळी माजी न.प.सभापती रुक्‍मीनबाई धोत्रे यांचे ते पती होते.

दरम्यान  तीपन्ना धोत्रे हे अत्यंत सुस्वभावी होते. सामाजिक कार्यामध्ये ते नेहमी कोणाच्याही मदतीसाठी पुढाकार घेत असत. ते मागील काही दिवसापासून आजारी होते  बुधवार दिनांक 29 जून रोजी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले पाच मुली नातवंडे असा परिवार आहे त्यांच्यावर बुधवारी सायंकाळी सहा वाजता वडार समाज स्मशान भूमीमध्ये   अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!