इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

दाऊतपूर येथे कै.कोंडीबा देवराव बिडगर यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रम

 दाऊतपूर येथे कै.कोंडीबा देवराव बिडगर यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रम


ह. भ. प. श्री. मधुकर महाराज सायाळकर यांचे कीर्तन 


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील दाऊतपूर येथील माजी सरपंच, ज्येष्ठ नागरिक कै.कोंडीबा देवराव बिडगर यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त ह. भ. प. श्री. मधुकर महाराज सायाळकर यांचे कीर्तन होणार आहे. तरी किर्तनाचा व भोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन बिडगर कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.

         परळी तालुक्यातील मौजे दाऊतपूर येथील माजी सरपंच, जेष्ठ नागरिक, सामाजिक, शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीमत्व कै.कोंडीबा देवराव बिडगर यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने अश्विन शु.10 (विजयादशमी) शनिवार दि.12 ऑक्टोंबर रोजी सकाळी 12 ते 2 ह. भ. प. श्री. मधुकर महाराज सायाळकर यांचे कीर्तन होणार आहे. परळी तालुक्यातील व शहरातील तसेच पंचक्रोशीतील सर्व गुणीजण महाराज, गायक, वादक, भजनी मंडळी तसेच ग्रामस्थ, नातेवाईक, परिसरातील भाविकांनी सुश्राव्य किर्तन ऐकण्यासाठी व भोजनासाठी श्री हनुमान मंदिर दाऊतपूर (परळी ते गंगाखेड रोडवर) येथे उपस्थित रहावे असे आवाहन ज्ञानोबा देवराव बिडगर, भिवा ज्ञानोबा बिडगर,अर्जुन ज्ञानोबा बिडगर,सुरेश ज्ञानोबा बिडगर  यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या