इमेज
  परळीत थार गाडीचा थरार : गाडीची धडक एका युवकाचा मृत्यू ! सीसीटीव्हीत घटना कैद, मध्यरात्री गाडी आणि आरोपी घेतला ताब्यात परळी वैजनाथ | एमबी न्यूज वृत्तसेवा....     परळी वैजनाथ येथे प्रशांत प्रल्हाद देशमुख या युवकाला एका थार गाडीने संत भगवान बाबा चौक ते तहसील कडे जाणाऱ्या रस्त्यावर धडक देऊन चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची गंभीर घटना समोर आली. या घटनेत प्रशांत देशमुख यांना गंभीर अवस्थेतअंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी परळी पोलिसांनी मध्यरात्रीनंतर संबंधित थार गाडी व आरोपीला ताब्यात घेतले आहे.        या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून देशमुख कुटुंबीयांनी हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित थार गाडी स्पष्टपणे दिसत आहे. फुटेजमध्ये चारचाकी वाहन चालकाने संशयास्पद पद्धतीने मागून गाडी आणून धडक दिल्याचे दिसत असून या घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम...

कृषी विभागाची जागा बस स्थानकासाठी हस्तांतरित करण्यास परवानगी

 सिरसाळा बसस्थानक उभारणीचा मार्ग पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केला मोकळा


कृषी विभागाची जागा बस स्थानकासाठी हस्तांतरित करण्यास कृषी विभागाने दिली परवानगी, शासन निर्णय निर्गमित



मुंबई (दि. 09) - परळी तालुक्यातील सिरसाळा येथे एस टी बसस्थानक उभारणी साठी जागेचा प्रश्न आज पालकमंत्री तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मार्गी लागला असून, बसस्थानक साठी कृषी विभागाच्या ताब्यात असलेली व सध्या वापरात नसलेली 2 एकर जागा महसूल मार्फत राज्य परिवहन महामंडळाला हस्तांतरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. 


कृषी विभागाचे सन 1996 सालचे कृषी तंत्रज्ञान केंद्र या जागेत होते. मात्र त्याचा कालावधी संपून ही जागा सध्या वापरात नव्हती. बस स्थानकास सिरसाळा गाव भागात अन्यत्र जागा उपलब्ध नसल्याने बसस्थानाकाचे का रखडले होते.


याचाच विचार करून धनंजय मुंडे यांनी जिल्हा कृषी कार्यालयामार्फत सदर जागेपैकी 2 एकर जागा परिवहन विभागास हस्तांतरित करण्याचा परिपूर्ण प्रस्ताव मागवून तो मंजूर केला आहे, त्यामुळे आता सिरसाळा येथे बसस्थानक उभारणीची वाट मोकळी झाली आहे. या जागेत बसस्थानक उभारणीचा प्रस्ताव राज्य परिवहन महामंडळाकडून मंजूर करून याठिकाणी भव्य बसस्थानक उभारणीचे काम लवकरच सुरू केले जाईल, अशी माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या