इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

आखाडा विधानसभेचा.....परळी मतदारसंघाचा !

परळी मतदारसंघात विधानसभेला दोन पत्रकारही निवडणूक रिंगणात!


परळी वैजनाथ, प्रतिनिधी

 संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदार संघात आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. यामध्ये प्रमुख लढत ही धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख अशी थेट लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे.परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूकीची वेगळी वैशिष्ट्येही आहेत. विशेष म्हणजे या निवडणूक रिंगणात दोन पत्रकारही उतरले आहेत.

    परळी विधानसभा मतदार संघामधून दोन पत्रकार उमेदवार ही निवडणूक लढवत आहेत पत्रकारितेच्या व सामाजिक कार्याच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क निर्माण करणारे पत्रकारही लोकशाहीमध्ये आपले राजकीय बळ आजमावत असतात या अनुषंगानेच दोन पत्रकार परळी विधानसभेची निवडणूक लढवत आहेत यामध्ये विकास इंडिया पार्टीकडून भागवत बबनराव वैद्य तर दै.सरकार चे संपादक साहस पंढरीनाथ आदोडे हे  मराठवाडा मुक्ती मोमार्चच्या वतीने उमेदवारी करत आहेत.

     बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातून एकूण उमेदवारी अर्जांपैकी केवळ अकरा अर्जाच शिल्लक राहिले आहेत. प्रबळ दावेदार प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघाची लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांच्यातच थेट होणार आहे.

      बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात  उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली यादरम्यान वै ठरलेल्या 377 उमेदवारांपैकी २३८ उमेदवारांनी माघार घेतली आहे आता सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये 139 उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत.. आता गेवराई मतदार संघात 21, माजलगाव मतदार संघात 34, बीड 31, आष्टी 17 , केज 25, परळी 11 याप्रमाणे उमेदवारी अर्ज कायम असून सहा मतदार संघात 139 उमेदवार आता नशीब आजमावणार आहेत. 

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार 

1 .धनंजय पंडितराव मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

2. राजेसाहेब किशनराव देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 

3. धोंडीराम लक्ष्मण उजगरे बहुजन समाज पक्ष 

4.केदारनाथ वैजनाथ जाधव पीजेन्टस् ॲन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया

5. भागवत बबनराव वैद्य विकास इंडिया पार्टी

 6.साहस पंढरीनाथ आदोडे मराठवाडा मुक्ती मोर्चा

 7.अल्ताफ खाजामिया सय्यद अपक्ष 

8.दयानंद नारायण लांडगे अपक्ष

9. राजेसाहेब उर्फ राजाभाऊ सुभाष देशमुख अपक्ष

10. शाकीर अहमद शेख,अपक्ष

11. हिदायत सादेकअली सय्यदअपक्ष


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या