इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

परळीत होणार जाहीर सभा !

नऊ तारखेला खा. शरदचंद्र पवार परळीत : जाहीर सभेचे आयोजन - ॲड. जीवनराव देशमुख

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

        काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची परळी येथे नऊ तारखेला जाहीर सभा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. जीवनराव देशमुख यांनी दिली आहे.

            परळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे बीड जिल्हा दौऱ्यावर असून परळी वैजनाथ येथे दिनांक 9 नोव्हेंबर रोजी त्यांची जाहीर सभा होणार आहे. महायुती सरकारच्या काळात सर्वसामान्य जनतेला बसलेल्या झळा आणि महाराष्ट्राच्या हिताच्या बाबतीमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या महायुती सरकारला धडा शिकविण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत जनमत महाविकास आघाडीच्या बाजूने असुन शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी कामाला लागण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहेत. स्वतः शरद पवार हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी जाहीर सभा घेत आहेत. त्याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथेही दिनांक 9 रोजी शरद पवार  यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. जीवनराव देशमुख यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट