निधन वार्ता....

 तळेगाव येथील युवा शेतकरी धनराज ज्ञानोबा तांबडे यांचे निधन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे तळेगाव येथील युवा शेतकरी धनराज ज्ञानोबा तांबडे यांचे आज मंगळवार दि. 5 नोव्हेंबर रोजी दुपारी आकस्मिक निधन झाले. मृत्यू समय ते 45 वर्षाचे होते.

     तळेगाव येथील शेतकरी धनराज तांबडे यांचे आज दुपारी गावामध्ये आकस्मिक निधन झाले. धनराज तांबडे हे अतिशय मनमिळावू स्वभावाचे आणि मिळून मिसळून वागणारे असल्याने सर्वांच्या परिचित होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे तळेगावावर शोककळा पसरली. कै. धनराज तांबडे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.

   कै. धनराज तांबडे यांच्या पश्चात वडील, दोन भाऊ, एक बहीण, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊजी, भावजई, पुतणे असा भरगच्च परिवार आहे. वैद्यनाथ कारखान्याच्या कामगार युनियनचे अध्यक्ष विष्णू तांबडे यांचे ते बंधू होत.

राख सावडण्याचा कार्यक्रम

     दरम्यान कै. धनराज तांबडे यांचा राख सावडण्याचा कार्यक्रम उद्या गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता तळेगाव येथे होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !