परळीत सभा : फुलचंद कराड यांनी केलं हे आवाहन

शरदचंद्र पवार यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा-फुलचंद कराड


परळी वैजनाथ(प्रतिनिधी)

 परळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारा निमित्त परळी शहरात होत असलेल्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार  हे मार्गदर्शन करणार असून या सभेला उपस्थित राहून परळी मतदारसंघातील परिवर्तनाच्या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी केले आहे.

 परळी येथील मोंढा मैदानावर शनिवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजता खासदार शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा होणार असून ही सभा परळी विधानसभा मतदारसंघाचा प्रत्यक्षात विकास करण्याची नांदी ठरणार आहे या सभेत महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित राहणार असून परळी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मोंढा मैदानावरील या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासाच्या या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन फुलचंद  कराड यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार