युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

मलकापुर येथे रविवारी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- मलकापुर येथे भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. तरी भाविक भक्तांनी धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मलकापूर ग्रामस्थ यांनी केले आहे. 

        परळी तालुक्यातील मलकापुर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कथा परिसता रामायण | पूर्वज उद्धरती | पुर्वजांचे नवल कोण | उद्धरे जाण त्रिजगती ||  भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रमाचे आयोजन मलकापुर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.  रामायण ग्रंथातील अध्याय वाचनास सकाळी ५ वा प्रारंभ होऊन, सांगता ४ वा होणार आहे. त्यानिमित्त रात्री ९ ते ११ ह.भ.प.रामायणार्य विजय महाराज वाघ बनकर हिंगोलीकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मण शक्ती कार्यक्रमास रामभक्त ह.भ.प.विनायक महाराज गुट्टे गुरूजी अध्यक्ष श्री संत जनाबाई संस्थान गंगाखेड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. नोट : वाचक, सुचक मंडळीनी १ वाजन्याच्या अगोदर उपस्थितीत राहावे. तरी या कार्यक्रमाचा व श्रावणाचा महाप्रसादाचा सर्व भाविक भक्तांनी, वाचक, सुचक श्रोत्यो मंडळींनी व पंचक्रोशीतील मंडळींनी लाभ घ्यावा असे आवाहन मलकापुर गग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या