इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सामूहिक शपथ

 राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात सामूहिक शपथ

भारत हा लोकशाही प्रधान देश आहे - व्यंकटेश मुंडे

परळी प्रतिनिधी 

भारत निवडणूक आयोगाद्वारे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत असून या अनुषंगाने नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे साहेब व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या उपस्थितीत सामूहिक शपथ घेण्यात आली. 

नाथ शिक्षा संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सामूहिक शपथ, व्याख्यान, मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असून याची सुरुवात परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे साहेब यांच्या उपस्थितीत सामूहिक शपथ घेऊन करण्यात आली. याप्रसंगी बोलताना तहसीलदार वेंकटेश मुंडे म्हणाले की जगाच्या पाठीवरती आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे ही आदर्श लोकशाही पुढे नेण्याचे कार्य येणाऱ्या पिढीला करावयाचे आहे यासाठी आपल्या परिसरातील एकही व्यक्ती मतदानापासून वंचित राहणार नाही व 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवकांनी आपले नाव मतदार यादी मध्ये नोंदवणे गरजेचे आहे.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे , परळीचे तलाठी व्ही. एस.गित्ते,यश कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.बी.गुट्टे, प्रा.ए.ए.मुंडे मॅडम, प्रा.यु.एन.फड, प्रा.ए.डी.शेख, प्रा.पी. पी.तिडके मॅडम, प्रा. पी.पी.परळीकर, एस.यु.पवार, व्ही. एन.शिंदे, जी.व्ही. कांबळे, ए.बी. जगतकर, यु.बी. जगताप यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या