इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

अवैध उत्खनन करणारांवर दंडात्मक कारवाई करा

राखेच्या बेकायदेशीर साठयांवर कारवाई करा

पर्यावरण मंत्री ना.पंकजा मुंडे थेट ॲक्शन मोडवर : राख,वाळु,डोंगर पोखरणारे, अवैध उत्खनन कोणाचीच गय करु नका !

जिल्हा प्रशासनाला स्पष्ट आदेश


पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक त्या कठोर उपाययोजना करण्याचेही आदेश


जप्त केलेली वाळू शासकीय घरकुलासाठी उपलब्ध करून द्या

बीड।दिनांक ०७।

    प्रदूषणाच्या नियमाचा भंग होत असल्याने औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील राखेच्या बेकायदेशीर साठयांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. जप्त केलेली वाळू शासकीय घरकुलाच्या बांधकामासाठी उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही देत प्रदुषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष करत असलेल्या अधिकाऱ्यांची त्यांनी कान उघाडणी केली.

        जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज प्रगती सभागृहात जिल्हयातील अवैध वाळू व तत्सम गौण खनिज उत्खणनामुळे होणारा पर्यावरणाचा –हास, बीड जिल्हयातील अवैध डोंगर पोखरल्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी तसेच औष्णिक वीज प्रकल्प, परळी येथे होणा-या राखेच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदुषण आदी विषयांवर ना. पंकजा मुंडे यांनी सर्व संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

      वीट भट्यासाठी मोकळया हायवामधून होणा-या अवैध वाहतुकीमुळे प्रदुषण वाढत असून याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे तसेच खाली सांडलेल्या राखेमुळे वातवरणीय बदल रोखण्यासाठी बंद हायवामधून ही वाहतूक होईल याकडे संबधितांनी लक्ष घालून तसा अहवाल सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

राखेचे साठे सील करा

चिमणीपासूनचे प्रदुषण नियत्रंणात असले तरी राख उचलणे हे संबधित अधिका-यांचे दायित्व आहे याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. राखेचे अनाधिकृत साठे सील करावेत. वाहतुकीचे नियम सर्वानी पाळावेत, राखेची वाहतुक गावातुन न करता ती बायबासनी करावी. दाऊतपूर एरियामध्ये किती राख आहे. याचे रेकार्ड  ठेवणे राखेचा साठा आजमितीला आहे तेवढाच पुढील तपासणीपर्यंत असायला हवा नसता संबधितावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असेही याप्रसंगी ना. पंकजाताई मुंडे यांनी सांगितले. 

जप्त केलेली वाळू घरकुलासाठी उपलब्ध करून द्या

   अवैध गौणखणिज वाहतुक वाळू,दगड, माती, मुरुम इत्तर खडी याची अवैध वाहतूक करणा-या किती लोकांवर कारवाई केली तसेच वाळू घाटाची संख्या किती. जप्त केलेली वाळू ही पंडीत दीन दयाळ उपाध्याय घरकूल योजनेसाठी वापरावी. गौण खणिजाचे अवैध उत्खणनावर प्रतिबंध घालावा असेही यावेळी त्या म्हणाल्या. 

अवैध उत्खनन करणारांवर दंडात्मक कारवाई करा

डोंगराचे अवैध उत्खनन करणा-यानां दंड करावा, दर तीन महिन्याला याचा अहवाल सादर करावा. डोंगराखाली होणारी प्लॉटींग अवैध असल्यास त्यावर प्रतिबंध घालावा. डोंगर पोखरल्यामुळे खाली राहणा-या कुंटूंबावर दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेही त्या यावेळी म्हणाल्या

या बैठकीस जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी कविता जाधव संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री महोदयांना पॉवर पाईटव्दारे (पीपीटीव्दारे) माहिती देण्यात आली बैठकीचे प्रस्ताविक आभार जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी मानले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या