इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

 व्हॉईस ऑफ मीडिया च्या राज्य संघटक पदी सुकेशनी नाईकवाडे(रॉय) यांची निवड

मुंबई .....मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया च्या राज्य कार्यकारणी वर राज्य संघटक म्हणून बीड येथील पत्रकार सुकेशनी नाईकवाडे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया राज्याची फादर बॉडी मध्ये सुकेशनी नाईकवाडे (रॉय)  यांची निवड होण्या अगोदर यांनी राज्यावर प्रदेश अध्यक्ष (महिला विभाग ) पदावर राहून महिलांची राज्य कार्यकारणी स्थापन करत राज्यात महिलांना व्हॉईस ऑफ मीडिया शी जोडण्याचे काम  चांगल्या पद्धतिने केले असून त्यांना व्हॉईस ऑफ मीडिया चे संस्थापक अध्यक्ष श्री.संदीप काळे यांनी सुकेशनी नाईकवाडे (रॉय) यांच्या कार्याची दखल घेत त्यांना नुकत्याच पार पडलेल्या   राज्य कार्यकारणी  मध्ये त्यांना राज्य संघटक पदावर त्याची निवड करत त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली असून त्यांचे राज्य संघटक पदी निवड झाल्या बाबद अभिनंदन केले आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री अनिल मस्के प्रदेश कार्याध्यक्ष श्री योगेंद्र दोरकर, सरचिटणीस डॉ. दिगंबर महाले, मंगेश खाटीक, विजय चोरडिया यांनी नव्या नियुक्ती बद्दल अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या