इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

शाहु-फुले-आंबेडकर आश्रमशाळांच्या अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार!

केज तालुक्यातील 'त्या' मयत आश्रमशाळा शिक्षकाच्या कुटुंबाला खा. सुप्रिया सुळे यांनी दिला कृतिशील आधार !

दोन्ही मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याबरोबरच मातेला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न


पुणे : पगार नाही म्हणून आत्महत्या केलेल्या शिक्षकाच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. याबरोबरच त्यांना कायम रोजगार मिळावा यासाठीही त्या प्रयत्न करणार आहेत. केज तालुक्यातील केळगाव येथे आश्रम शाळेत तब्बल अठरा वर्षे काम करूनही पगार मिळत नसल्याने आपल्या अवघ्या तीन वर्षीय लेकीला पत्र लिहून माफी मागत या शिक्षकाने आत्महत्या केल्याने उभा महाराष्ट्र हळहळला होता. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेबाबत संवेदनशीलता दाखवत खासदार सुळे यांनी या कुटूंबाला पूर्णपणे आधार द्यायचा निर्णय घेतला आहे.


केळगाव येथील आश्रमशाळेत धनंजय नागरगोजे हे गेल्या अठरा वर्षांपासून कार्यरत होते. वारंवार पगार मागूनही त्यांना पगार दिला गेला नाहीच उलट 'तू आत्महत्या कर' असा जीवघेणा सल्ला संस्था चलकांकडून दिला गेल्याचे स्वतः नागरगोजे यांनीच आपल्या लेकीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मुलांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी काही करू शकलो नाही, असे म्हणत अवघ्या तीन वर्षांच्या लेकराची माफी मागत त्यांनी आपले जीवन संपवले. या कुटूंबाची माहिती मिळताच सुळे यांनी त्यांच्याशी संपर्क साधून आधार दिला. त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी आता नागरगोजे यांच्या कुटूंबाला प्रत्यक्ष कृतीतून आधार द्यायचे ठरवले आहे. 


ज्या मुलीच्या नावे नागरगोजे यांनी पत्र लिहिले तीन वर्षांची त्यांची लेक आणि त्यांच्या पत्नीच्या उदरात वाढत असलेले दुसरे अपत्य या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सुळे यांनी घेतली आहे. याशिवाय त्या मातेला आणि त्यांच्या दिराला नोकरी मिळावी यासाठी शासनदरबारी आपण पाठपुरावा करू, असे अश्वासनही त्यांनी दिले आहे. याबरोबरच विनाअनुदानित आश्रम शाळांना टप्पा अनुदान मिळूनही अद्याप शासनाकडून या शाळांना निधी मिळाला नाही, तो लवकरात लवकर मिळावा, यासाठीही पाठपुरावा करू असे सुळे यांनी म्हटले आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे पदवीधर सेल चे प्रदेशाध्यक्ष डॉ नरेंद्र काळे यांनी काल (दि. १९) केज तालुक्यात देवगाव येथे नागरगोजे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली. तसेच त्यांची विचारपूस करत खासदार सुप्रियाताई सुळे या कुटुंबाच्या पाठीशी समर्थपणे उभ्या असून कोणत्याही प्रकारची चिंता करू नये, असा शब्द दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या