इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

 भगवान परशुरामांनी शस्त्र व शास्त्राचा वापर मानव कल्याणासाठी केला - अश्विन मोगरकर


परळी वैजनाथ,प्रतिनिधी....

भगवान विष्णूंचे सहावे अवतार भगवान परशुरामांनी शस्त्र व शास्त्राचा वापर मानव कल्याणासाठी केला असल्याचे प्रतिपादन अश्विन मोगरकर यांनी भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

गणेशपार भागातील सावळाराम मंदिर येथे भगवान विष्णूंचे सहावे अवतार भगवान परशुराम यांच्या जयंती मंगळवार, 29 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना अश्विन मोगरकर यांनी भगवान परशुराम यांच्या दैवी अवतारावर बोलताना पुढे सांगितले की, फक्त ऋषी म्हणून शास्त्र हाती एव्हढेच नव्हे तर गरज पडली तर शस्त्र हाती घेऊन भगवान परशुरामांनी अत्याचारी राजांना हरवून निशस्त्र केले. मानव कल्याणासाठी उन्मत्त सत्ताधार्यांनी जनतेवर केलेल्या अत्याचाराविरोधात शस्त्र हाती घेतले. प्रारंभी भगवान परशुरामांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी विजय जोशी, धनंजय आढाव, पद्माकर शहाणे, विरकुमार स्वामी, राजेश कौलवार, बालकृष्ण फुले, श्रीपाद चौधरी, गुरुनाथ हालगे, सत्यनारायण मानधने, राहुल पाचेगावकर, लहू हालगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विजय जोशी यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....