इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

 चोऱ्या वाढल्या, नागरिक बेजार : दोन लाख सत्तर हजाराची घरफोडी

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
       सध्या चोऱ्यांचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरु झालेले असुन नागरिक बेजार झाले आहेत. वाढलेल्या चोऱ्या आणि सर्व प्रकारच्या चोरट्यांचा धुमाकूळ  यामुळे चोऱ्या रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. बर्दापुर येथे धाडसी घरफोडी झाली असुन यामध्ये दोन लाख सत्तर हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे.
     याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी महेबुब खयुम खुरेशी यांच्या  बर्दापूर येथील मावशी बाणु बाबामियाँ कुरेशी यांच्या घरी चोरी झाली.अज्ञात चोरट्याने घरातील रूमचा दरवाजा खालच्या बाजुने तोडुन रूममधिल कपाटाचे लॉक तोडुन कपाटात बाणु बाबामियाँ कुरेशी यांनी ठेवलेले नगदी दोन लाख रूपये व सोन्याच्या पाच ग्रॅम च्या चार अंगठया असे एकुण २,७०,००० रू ऐवज चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी बर्दापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास बर्दापुर पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....