इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबाची जबाबदारी ना.पंकजा मुंडेंनी स्विकारली

निर्घृण हत्येने मन सुन्न झाले ; धडाडीचा कार्यकर्ता गमावल्याचे दुःख

बीड ।दिनांक १७।

      भाजपचे लोकसभा विस्तारक बाबासाहेब आगे यांच्या निर्घृण हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी स्विकारली आहे. आगे यांच्या हत्येने मन सुन्न झाले, एक धडाडीचा कार्यकर्ता मी गमावला आहे अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. 


    बाबासाहेब आगे यांची निर्घृण हत्या झाल्याची बातमी जेव्हा कानावर आली, ते ऐकून मन सुन्न झाले. काहीच सुचत नव्हते, त्यामुळे एका दिवसानंतर ना. पंकजा मुंडे यांनी या घटनेवर आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. आगे हे भाजपचे धडाडीचे कार्यकर्ते होते, संघाचे संस्कार त्यांचेवर असल्याने प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव होता. माझ्या लोकसभा निवडणुकीत बुथ विस्तारक म्हणून अतिशय महत्वाची जबाबदारी त्यांनी खूप मेहनतीने पार पाडली. अशा मनमिळावू कार्यकर्त्याची अशा प्रकारे निर्घृण हत्या झाली हे ऐकून मनाला खूप वेदना झाल्या. या घटनेचा मी तीव्र निषेध करते. जिल्हयात आल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या पत्नी व कुटुंबाची भेट घेणार आहे.  त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखात माझा परिवार सहभागी आहे. आगे यांच्या कुटुंबाची जबाबदारी मी घेणार असून त्यांना सर्वतोपरी मदत करेल असं ना. पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या