दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

क्रीडा भारती अंबाजोगाई चा स्थापना दिवस उत्साहात साजरा

अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)-

क्रीडा भारती अंबाजोगाईच्या वतीने श्री हनुमान जयंती तथा क्रीडा भारती स्थापना दिवस उत्साहात संपन्न झाला.

श्रीराम नगर अंबाजोगाई येथील केशरीनंदन हनुमान मंदीरात आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा भारतीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने बलोपासनेची देवता श्री महाबली हनुमान जन्मदिनाच्या निमित्ताने पुजा व आरती करण्यात आली.

यावेळी क्रीडा भारती चे योग शिक्षक उत्रेश्वर पांचाळ गुरुजी यांनी व्हिएतनाम येथील हनोई येथे वर्ल्ड योगा स्पोर्ट्स फेडरेशन तर्फे नुकत्याच संपन्न झालेल्या वर्ल्ड आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगासन स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवून सिल्व्हर मेडल प्राप्त केल्याबद्दल क्रीडा भारती अंबाजोगाई च्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी अंबाजोगाई तालुका क्रीडा समन्वयक दत्ता देवकते, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक रमणजी सोनवळकर, पत्रकार ज्ञानेश मातेकर, सतिश बलुतकर,सह क्रीडा भारती चे. सदस्य तथा क्रीडाप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....