इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

अखेर निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंना केलं बडतर्फ!

'गब्बर इज बॅक' असे स्टेटस ठेवले होते :पोलीस दलातून दिला संदेश 'गब्बर गो बॅक'

बीड: सायबर पोलिस ठाण्यातील वादग्रस्त निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यास छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी कासले याला पोलिस खात्यातून डिसमीसचे आदेश काढल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली आहे.


रणजित कसले याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. तो गुरूवारी रात्री उशिरा पोलिसांना शरण येणार होता, परंतू तसे न करता तो एका लॉजवर जावून झोपला. आज सकाळी बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. परंतू त्या आधीच गुरूवारी रात्री छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी कासले याला पोलिस खात्यातून डिसमीसचे आदेश काढले.रणजित कासले हा सायबर पोलिस ठाण्यात असताना विनापरवानगी आरोपीला घेऊन गुजरातमध्ये गेला होता. तेथे त्याने पैसे घेतल्याचा आरोप झाल्यने २६ मार्च रोजी त्याला निलंबित केले होते. त्यानंतर कसले याने अनेक व्हिडीओ व्हायरल केले होते. यातील एकामध्ये त्याने एका समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केले. या प्रकरणी बीडमधील वकिलाच्या फिर्यादीवरून १४ एप्रिल रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिस त्याच्या मागावर होते. परंतू तो सापडत नव्हता, उलट त्याने महाराष्ट्र पोलिसांना हिंमत असेल तर पकडून दाखवा, असे आव्हान दिले होते. परंतू गुरूवारी रात्री तो पुण्यात आला. विमानतळावरच त्याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने पुन्हा एकदा सरकार आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यावर आरोप केले. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यावरही सडकून टिका केली.

'गब्बर इज बॅक' असे स्टेटस

गुरुवारी सकाळी कासले याने सोशल मिडीयावरून काही रिल्स व्हायरल केल्या. यात त्याने 'गब्बर इज बॅक' असे लिहून चारचाकी वाहनाची स्पीड १५७पर्यंत असल्याचे दाखविले. याच वाहनात त्याने आपली पोलिसची टोपीही समोर ठेवल्याचे दिसत आहे. निलंबणानंतरही समोर टोपी ठेवून तो इतरांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता.


बीड पोलिसांना घुमवले


अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कासलेच्या मागावर धावले. परंतू त्यांनाही तो सापडला नाही. वेगवेगळे ठिकाण सांगून त्याने बीड पोलिसांना दोन दिवस चांगलेच घुमवले. गुरूवारीही तो शरण येणार असे, सांगितले होते, परंतू त्याने पुन्हा एकदा चकवा दिला. परंतू बीड पोलिसांनी पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका लॉजमधून कासले याला ताब्यात घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या