इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

 पहेलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर परळीत श्री भगवान परशुराम जयंतीची शोभायात्रा रद्द

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने परळी वैजनाथ येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात भगवान श्री परशुराम जयंतीची शोभायात्रा काढण्यात येते. मात्र यावर्षी जम्मू-काश्मीर येथील पहेलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेत काही देश बांधव मृत्युमुखी पडले तर काहीजण जखमी झाले आहेत. अशा दुर्दैवी प्रसंगात उत्सव साजरा करणे संयुक्तिक नाही. त्यामुळे यावर्षीची शोभायात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

       परळी वैजनाथ येथे दरवर्षी भगवान श्री परशुराम जयंती निमित्त भव्य दिव्य व मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात येते. मात्र यावेळी ही शोभायात्रा न काढण्याचा निर्णय घेण्यात असुन केवळ घराघरात श्री भगवान परशुराम प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमाने श्री भगवान परशुराम जयंती साजरी करण्यात येणार आहे. अशी माहिती सकल ब्राह्मण समाज परळीच्या वतीने देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....