इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

दुर्दैवी घटना.....

उन्हाळी सुट्टयांसाठी नातेवाईकांकडे आलेली शाळकरी मुलगी कॅनॉल मध्ये गेली वाहून : १२ तासानंतर सापडला मृतदेह


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

         परळी जवळील नवीन औष्णिक विद्युत केंद्र परिसरात असलेल्या लोणी तांडा येथे उन्हाळी सुट्ट्यांसाठी आपल्या नातेवाईकांकडे राहायला आलेली दहा वर्षाची शाळकरी मुलगी जवळच असलेल्या कॅनलच्या पाण्यात वाहून गेल्याचा प्रकार काल (दि. 28) रोजी घडला. नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन विभागाने तब्बल 12 तास या मुलीचा शोध घेतला. दरम्यान आज (दि.२९ ) सकाळी उक्कडगाव ता. सोनपेठ जिल्हा परभणी जवळील कॅनाॅलमध्ये या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला आहे.

       सध्या जायकवाडी धरणातून कॅनॉल मध्ये पाणी सोडण्यात आलेले आहे. या कॅनॉलला आलेल्या पाण्यामध्ये कपडे धुत असलेली शाळकरी मुलगी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना सोमवार दि 28 रोजी घडली. परळी नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सुनील आदोडे,नितीन जगतकर निखील वाघमारे, निखील गोदाम, वाहनचालक विठ्ठल गित्ते आदींनी अथक प्रयत्न करून शोधमोहीम सुरु केली होती.काल रात्री उशिरा पर्यंतही या मुलीचा शोध लागला नाही. आज सकाळ पासूनच पुन्हा नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शोध मोहीम सुरू केली असता उक्कडगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी जवळील कॅनॉल मध्ये या मुलीचा मृतदेह आढळून आला आहे मयत मुलगी ही पुणे येथील शाळेत शिकायला होती.उन्हाळी सुट्टीत ती परळीला नातेवाईकांकडे राहयला आली होती. शिवकन्या अजय चव्हाण ( वय10 वर्ष) असे मयत मुलीचे नाव आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला.दरम्यान या शाळकरी मुलीच्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....