इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

Burning Truck @ Parli Vaijanath....

थरारक : परळीत भर उन्हात, भर रस्त्यावर उभा ट्रक पेटला ;आगीचे व धुराचे लोट भिडले गगनाला !




परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

         परळी वैजनाथ शहरातील बीड व परभणी कडे  जाणाऱ्या रस्त्यावरील  छत्रपती संभाजी महाराज चौक (इटके कॉर्नर) या ठिकाणी भर उन्हात, भरस्त्यावर दुपारी ४.३० वा.सुमारास उभ्या ट्रकला आग लागून हा ट्रक पेटला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या घटनेने जवळपास पाऊण तास पेटलेल्या ट्रकचा थरार बघायला मिळाला. नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने ही आग आटोक्यात आणली आहे.

          परळी शहरात असलेल्या इटके कॉर्नर वर बीडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक  एम एच  24 |7896 या क्रमांकाचा ट्रक उभा  होता. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक या ट्रक मधून आगीचे लोळ बाहेर येताना दिसले. बघता बघता या ट्रक वरून आगीचे लोट उठल्याचे दिसून आले. संपूर्णत: पेटलेला ट्रक नागरिकांना दिसला. तातडीने नागरिकांनी परळी नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला फोन केला. लगेचच  नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या  त्याचबरोबर औष्णिक विद्युत केंद्राची एक अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल झाली. हा थरारक पेटलेला ट्रक व आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर  केले. सर्व बाजूंनी संपूर्णतः ट्रक पेटला होता. त्यामुळे आगीचे व धुराचे लोट संपूर्णतः आकाशाला भिडल्याचे दिसून येत होते. त्यामुळे बीडकडे व परभणीकडे जाणारी वाहतूकही ठप्प झाली होती. तब्बल पाऊण तासानंतर या ट्रकला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन विभागाला यश मिळाले आहे. दरम्यान उभ्या ट्रकला नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस प्रशासन व संबंधित प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहचली असुन चौकशीअंती ही आग लागण्याचे कारण स्पष्ट होणार आहे. परंतु उभा पेटलेला ट्रक चा थरार बघण्यासाठी मात्र घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती.

LIVE व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा👇



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट