इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 बीड जिल्हा ग्राहक पंचायत व ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थे कडून 12  परीक्षेत यशाबद्दल सत्कार




           गेवराई ( प्रतिनिधी ) आर बी अट्टल कॉलेज येथील विद्यार्थी कल्पेश कल्याण मुळे यांनी बारावी परीक्षांमध्ये (91.5) टक्के गुण घेऊन आर बी अट्टल कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल त्याचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. त्याचा सत्कार नगरपरिषद ज्येष्ठ नागरिक कार्यालय विरंगुळा केंद्र येथे करण्यात आला. 

  कल्पेश कल्याण मुळे यांनी इयत्ता बारावी परीक्षेमध्ये 91.5 गुण घेऊन यश संपादन केले आहे .  त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाक्याची कठीण असून  त्यांचे वडील कल्याण मुळे यांना खाजगी नोकरीआहे. 

  कल्पेश यांनी अथंग  परिश्रम करून सातत्य पूर्ण अभ्यास करून यश संपादन केले आहे. कल्पेश यांनी लहानपणीपासून विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे. 

    कल्पेश याच्या यशाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन वर्षाव होत आहे. त्याच्या यशाची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष व श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिल बोर्डे एडवोकेट  बी एम मुळे आय टी  आंबदरे सर विश्वास चपळगावकर कल्याण मुळे आदींनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!