सह्याद्री भुषण पुरस्कार - 2025 चा वितरण सोहळा उत्साहात
सह्याद्री मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संघाचा ५ मे रोजी प्रथम वर्धापनदिन सोहळा साजरा
केज (बीड) प्रतिनिधी
दि. 5 मे रोजी केज येथे सह्याद्री मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित "सह्याद्री भुषण पुरस्कार 2025" वितरण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी केज तालुक्यातील जेष्ठ नेतृत्व व ज्यांनी आजवर आपल्या कारकीर्दीत विविध समाजोपयोगी पदे भुषविले असे थोर मार्गदर्शक मा. श्री अँड राजेसाहेब देशमुख यांना सह्याद्री भुषण जिवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर नाव्होली येथील भुमिपुत्र मा . सि .ए . इनामदार (माजी नायब तहसीलदार) तथा कृषी व सामाजिक प्रश्नांवर आपला संघर्ष अविरत सुरू ठेवणारे यांना कृषी व सामाजिक क्षेत्रातील कार्याबददल सह्याद्री भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले व केजच्या मातृभुमीत अक्षर बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक कार्यात सतत अग्रभागी असलेल्या संस्थेस सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री विष्णू यादव , सचिव श्री विक्रम डोईफोडे संचालक श्री महादेव ढाकणे सर , संचालक तथा शिक्षक सहकारी पतसंस्था केजचे कोषाध्यक्ष श्री किशोर भालेराव , उपाध्यक्ष श्री. युवराज हिरवे , श्री सदस्य श्री राहुल काकनाळे , श्री राहुल उंडाळे इ यांच्या संस्थेस सामाजिक शैक्षणिक सह्याद्री भुषण पुरस्कार तर केज तालुक्यातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविण्यासाठी व केज तालुक्याचे नाव पटलावर आणण्यासाठी अविरत कार्य करणारे केज तालुका क्रीडा संयोजक मा. प्रा विनोद गुंड सर यांना क्रीडा क्षेत्रासाठी सह्याद्री भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व केज बसस्थान येथे मागील अनेक वर्षांपासून अविरत क्रांती पेपर एजन्सी केजच्या माध्यमातून वर्तमान पत्र वितरण सेवेतील कार्याबद्दल मा श्री दिलीप गवळी यांना सह्याद्री भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सदरील वितरण समारंभ जेष्ठ मार्गदर्शक अँड राजेसाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते व सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष गोविंद शिनगारे, प्रदेशाध्यक्ष डॉ जावेद शेख , प्रदेश कार्याध्यक्ष शहाजी भोसले यांच्या विशेष उपस्थितीत मान्यवरांना सह्याद्री भुषण पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आले व यावेळी सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे केज तालुका अध्यक्ष श्री अनिल ठोंबरे यांना वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्वांच्या वतीने सह्याद्री भुषण सन्मानचिन्ह , शाल पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले यावेळी संघाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त सर्व पत्रकार पदाधिकारी यांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात येऊन संघाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना भरभरून शुभेच्छा देत संघाच्या कामगिरीचे कौतुक केले व येणाऱ्या काळात कोणत्याही मदतीसाठी आम्हाला हाक द्या असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले यावेळी सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे श्री सुमंत कदम , पुणे जिल्हा अध्यक्ष अशोक मोरे , पुणे जिल्हा सचिव इंजि. दत्ता शिनगारे , बीड जिल्हा अध्यक्ष विनोद शिंदे , बीड जिल्हा सचिव अर्शद सय्यद, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष प्रा दत्ता जाधव , आष्टी तालुका अध्यक्ष मेजर विकास म्हस्के , अंबाजोगाई तालुका सचिव गोविंद लांडगे युवा कार्यकर्ते श्री युवराज मगर , यांची विशेष उपस्थिती होती .
सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्य आयोजक सह्याद्री मराठी पत्रकार संघ केज तालुका कार्यकारिणीचे अध्यक्ष अनिल ठोंबरे सचिव श्री . डॉ लतिफ शेख , कार्याध्यक्ष श्री महादेव दौंड , उपाध्यक्ष श्री दत्तात्रय भाकरे , सदस्य अर्शद शेख , बीड तालुका उपाध्यक्ष श्री दिलीप बेलवडकर , सदस्य श्री अनिल कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद शिनगारे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ जावेद शेख यांनी मांडले व सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा