इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

हिंदू देवतांची विटंबना करणाऱ्या समाज कंटकांचा परळीत निषेध : तीव्र कारवाईची मागणी

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       पुण्यातील पौड मुळशी येथील नागेश्वर मंदिरात देवतांची विटंबना व अतिशय घृणास्पद कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना कठोरात कठोर शासन करावे या मागणीबाबत सकल हिंदू समाज परळी वैजनाथ च्या वतीने आज निवेदन देण्यात आले. तसेच या समाजकंटकांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

   परळी वैजनाथ येथील तहसील कार्यालयात सकल हिंदू समाज बांधवांनी एकत्र येत पौड मुळशी येथील हिंदू देवतेच्या विटंबनेचा व गैरकृर्त्याचा जाहीर निषेध केला. याप्रसंगी हिंदू देवदेवतांची विटंबना करून हिंदू समाजाची श्रद्धा व भावना दुखवल्याबद्दल या माथेफिरू युवक व त्याच्या या कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या त्याच्या बापावर गुन्हे दाखल करून कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या निषेध आंदोलनात मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव सहभागी झाले होते.

 अन्यथा तीव्र आंदोलन करू...

         दरम्यान, याप्रसंगी संतापलेल्या हिंदू धर्मीय समाज बांधवांनी पौड मुळशी येथील घडलेली घटना ही आमच्या धार्मिक भावना दुखावणारी असुन अशा घटना जाणीवपूर्वक घडविणाऱ्यांच्या विरोधात जशास तसे उत्तर यापुढे द्यावे लागेल अशी वेळ शासनाने आणू नये. विशिष्ट लोक अशा पद्धतीने हिंदू धर्मीय बांधवांच्या सातत्याने भावना दुखविण्याचा प्रयत्न करणार असतील तर यापुढे हिंदू समाजाच्या वतीने अतिशय तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....