इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कार्यक्रम

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप -पंकजा मुंडे 

ना. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत जबलपूर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कार्यक्रम

बेडाघाटावरील नर्मदा नदीच्या मध्यभागी केली शिवलिंगाची पूजा

जबलपूर, (म.प्र.) ।दिनांक २९। 

जीवनामध्ये कितीही कठीण परिस्थिती आणि संघर्ष आला तरीही त्यावर मात करून जनहिताची असंख्य कार्य करणारे महापुरुष हे आपले आदर्श आहेत. धर्मकार्य, संस्कृतीसंरक्षण, निकोप राजसत्ता आणि शौर्य गाजवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहेत .आपल्या राजकीय वाटचालीतही त्यांचाच आदर्श घेऊन आपण पुढे जात आहोत. धैर्य, शौर्य व अऔदार्य याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी मध्यप्रदेश येथे आयोजित पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती समारोहामध्ये केले.

       लोकमाता पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर  यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त मध्यप्रदेशातील राणीतल (जबलपूर) येथील भाजप कार्यालयात ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.


 स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना  संबोधित करताना ना. पंकजाताईंनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला उजाळा देत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. खासदार आशिष दुबे, महानगर जिल्हा अध्यक्ष रत्नेश कुमार, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजकुमार पटेल, भाजप मध्य प्रदेश कोषाध्यक्ष अखिलेश जैन आदींसह पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. 


उत्कृष्ट भाषणाला उपस्थितांची दाद

--------

मध्य प्रदेशातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहात पंकजाताई मुंडे यांचे जोरदार स्वागत केले. त्यांच्या भाषणादरम्यानही प्रचंड प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटासह उपस्थितांनी त्यांच्या वक्तृत्वाला दाद दिल्याचे दिसुन आले.

   यावेळी बोलतांना ना.पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संपूर्ण जीवनचरित्राचा विचार केला तर त्या महाराणी तर होत्याच मात्र आपल्या शौर्याने त्या राजाही बनल्या. केवळ राजसत्ता नव्हे तर संपूर्ण भारतभरात सनातन धर्म, संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी त्यांचे कार्य हे अधोरेखित होते. आपल्या जीवनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेऊ आपण वाटचाल करीत आहोत. अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनचरित्रातून संघर्ष आणि त्या संघर्षावर शौर्याने केलेली मात हा एक मोठा सिद्धांतच शिकायला मिळतो. केवळ राजसत्ता नाही तर एक स्त्री म्हणून ममत्वभावाने त्यांनी प्रजेवर केलेले प्रेम आणि सर्वांनाच आनंददायी राजसत्ता याचा अनुभव त्यांनी दिला. आपल्या धर्मातील अनिष्ट प्रथांना बाजूला सारत आपल्या सनातन संस्कृतीचे महत्त्व ओळखून त्यांनी देशभर अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार व आपली आध्यात्मिक परंपरा पुढे घेऊन जाण्याचे काम केलेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे शौर्य, धैर्य आणि औदार्य याचे मूर्तीमंत स्वरूप असून त्यांचा आदर्श पुढे घेऊन वाटचाल केल्यास जीवनात उन्नती झाल्याशिवाय राहणारच नाही. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शिकवणीवर आपण वाटचाल करावी असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले.


अहिल्यादेवींनी स्थापित केलेल्या शिवलिंगाची पूजा

-------

बेडाघाट येथे नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेल्या मंदिरात अहिल्याबाईंनी स्थापित केलेल्या शिवलिंगाचे ना. पंकजाताईंनी पूजन केले.अहिल्यादेवी होळकर यांचे धार्मिक कार्य मोठे आहे. याचाच सार बेडाघाट इथेही दिसून आला. नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेले हे शिवालय अहिल्यादेवीनीं स्थापन केलेले आहे. त्यांच्या धार्मिक बांधिलकीची साक्ष देणाऱ्या मंदिरात पूजन करून आत्मिक प्रसन्नता लाभली असं त्या म्हणाल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या